सामान्य जनतेच्या संपर्कात राहुन पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रीत करणार ; माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
चिकोडी लोकसभेच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्यावतीने माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व विद्यमान आमदार सौ. शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली भीवशी येथे कार्यकर्त्यांनसाठी चिंतन, मंथन, विचार विनिमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चिक्कोडी लोकसभेतील निपाणी मतदारसंघाच्या "लोकसभा निवडणूक आढावा बैठक" आणि भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिल्याबद्दल मतदारांचे चिक्कोडी लोकसभेचे माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, माजी मंत्री व विद्यमान आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला उद्देशुन बोलताना माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी भरपुर कष्ट घेतले आहेत, तरी पण यावेळेस आम्हीं कुठे कमी पडलो यावर विचार करणे गरजेचे आहे. कारण निवडणूकीत हार, जीत हे स्वाभाविक आहे. मी पराभवाला आव्हान समजून मतदार संघातील माझ्या जनतेच्या सतत संपर्कात राहुन त्याच्या समस्या मिटवून पक्ष संघटनसाठी संपुर्ण लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगितले. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सौ. शशिकला जोल्ले म्हणल्या सामान्य जाणता हीच जोल्ले समूहाची ताकत आहे, मी यापुढेही सदैव कर्यकर्तेर्च्या पाठीशी राहीन. आगामी सर्व निवडणुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने आम्हीं लढविण्यास सज्ज आहोत. येणाऱ्या काळात मी केन्द्र व राज्य शासनाच्यावतीने विकासनिधी आणून भागाचा कायापालट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थीत मान्यवर व कार्यकर्त्यांनी आपल्या मनोभावणा व्यक्त केल्या. यावेळी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा