कुरुंदवाड शहरासह परिसरामध्ये वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
कुरूंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड शहरासह परिसरामध्ये वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी कुरुंदवाड शहरासह परिसरामध्ये वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वटपौर्णिमेला सुवासिनी महिला वडाच्या झाडाचे पूजन करून त्यास पंचामृत, केळी, आंबे, पेरू, सफरचंद आदी फळांचा नैवेद्य दाखवून पंचारती ओवाळतात व पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी साकडे घालतात. जन्मोजन्मी हाच पती मिळावा, अशी प्रार्थना करीत सुहासिनी महिलांनी वडाच्या झाडास दोरा गुंडाळत प्रदक्षिणा घालत साकडे घातले. येथील माळ भागावरील लक्ष्मी मंदिराजवळील वडाच्या झाडाचे पूजन करून महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली.
वटपौर्णिमेनिमित्त शहरातील सर्व सुहासिनी महिला अंगावर सर्व प्रकारचे दाग दागिने परिधान करून पारंपारिक वेशभूषा धारण करून नटून, थटून सकाळपासूनच शिवतीर्थ गणपती मंदिर जवळ,समर्थ कट्टा कॉलेज रोड,भैरववाडी बिरोबा देवळानजीक,काळाराम मंदिर जवळ बिरोबा मंदिर आदी ठिकाणच्या वडाच्या झाडाचे पूजन करण्यासाठी जाताना दिसत होत्या. वडाच्या झाडाचे पूजन केल्यानंतर महिला एकमेकींना हळदी, कुंकू व केळी आंबे आदी फळांची ओटी भरत होत्या.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा