क्लासमेंट ग्रुप घोसरवाडच्या वतीने हायस्कूलमध्ये वृक्षारोपण
घोसरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
शाळा हे ज्ञानदानाचे व सर्वांगीण विकासाचे महत्त्वाचे केंद्र.शाळेच्यामुळेच अनेकांचे जीवन सुखमय होत असते.जीवनातील एक महत्वाचे समाजाचे प्रतिबिंब शाळेतून दिसत असते.शाळेच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न अनेक विद्यार्थी एकत्र येवून करीत असतात.अनेक उपक्रम राबवित असतात.असाच एक छोटासा पर्यावरणपूरक उपक्रम घोसरवाड हायस्कूलमधील १९९९ते २०००च्या कलासमेंट ग्रुपने केला.वाढत जाणारे तापमानाचा विचार करून वृक्षारोपण करण्याचा निर्धार केला.
घोसरवाड हायस्कूलच्या प्रांगणात श्रीमंत विजीतसिंह शिंदे सरकार,ग्रामपंचायत सदस्या उत्तरादेवी शिंदे सरकार, चेअरमन रामचंद्र भांगे,सरपंच साहेबराव साबळे यांचे प्रमुख उपस्थितीत शिक्षकवृंद व वर्गमित्रांनी मिळून वृक्षारोपण केले.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याप्रसंगी भाजपा शिरोळ तालुका उपाध्यक्ष प्रदीप पाटील,गुरुप्रसाद परुळेकर,विक्रम नाईक,संतोष होगाडे,सुरेश पाटील,विजय शिंदे,प्रकाश वडर,राजू वडर,सूरज नरदे,कल्लाप्पा पुजारी,दीपक संकपाळ,किरण संकपाळ,राजू चौगुले,गौस मुल्ला,अर्जुन भोरे, बाळासाहेब संकपाळ,रघुनाथ पाटील,एकनाथ आळवणे,उमेश मिसाळ,तानाजी नंदिकुरळे,राजू गावडे,समीर घाट,प्रशांत नाईकवाडे,अमोल जुगळे,संजय कमते,धोंडिराम माने,विकास गुरव उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा