पालिकेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे जयसिंगपूरच्या लौकीकात भर : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

राजर्षी शाहू महाराज यांनी आपले पिता जयसिंग महाराज यांच्या नावावर जयसिंगपूर शहराची उभारणी केली आहे. जयसिंगपूर शहराला मोठी बाजारपेठ निर्माण व्हावी या उद्देशाने शहर आखीव - राखीव त्यांनी बनविले आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासून जयसिंगपूर शहराच्या लौकिकात वाढ करण्यासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही. जयसिंगपूर पालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात एलईडी बल्बचे पोल लावून शहराच्या लौकिकात भर टाकली आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने जयसिंगपूर शहरात पालिकेच्या वतीने सिद्धेश्वर कॉलनी शाहूनगर तसेच स्टेशन रोड येथे एलईडी पोलची उभारणी करण्यात आली असून विविध ठिकाणी बसविण्यात आलेल्या एलईडी पोलचा लोकार्पण सोहळा आमदार यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, शिरोळ तालुक्याच्या विकासाबरोबर जयसिंगपूर शहराचा कायापालट केला जात आहे. जयसिंगपूर नगरपालिकेच्या नावीन्यपूर्ण इमारतीमुळे शहराच्या लौकिकात नक्कीच भर पडेल. यासह शहरातील विविध ठिकाणी विकास कामांच्या माध्यमातून शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न आम्ही करीत असल्याचे सांगितले. 

यावेळी शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे,राजेंद्र झेले,माजी नगरसेवक राहुल बंडगर, असलम फरास, संजय कुलकर्णी,दादा पाटील(चिंचवाडकर),जयसिंगपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी टीना गवळी, अशोक बेडकुळे,राजेंद्र दाइंगडे, शैलेश लोहिया,अशोक घोरपडे,नितीन पाटील, रणजीत जगदाळे,रवींद्र पाटील,आनंद मिनियार,अमर नलवडे,राहुल पाटील, बापूसाहेब जगदाळे,विनोद निटवे, संजय मगदूम,चंद्रकांत कुलकर्णी, माजी नगरसेवक महेश कलकुटगी,अर्जुन देशमुख शितल गतारे, मुरगुंडे आऊ, अनुराधा आडके यांच्यासह देशमुख वहिनी,अशोक मळगे,सुभाष मुरगुंडे, प्रतीक काळे,आनंदा गाडीवडर, लिंगाप्पा वागोली व जयसिंगपूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष