शरद इन्स्टिट्युटच्या ८ विद्यार्थ्यांची सिमेन्स कंपनीत निवड
यड्राव / शिवार न्यूज नेटवर्क :
यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांची सिमेन्स या आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीत निवड झाली.
महाविद्यालयातील कॉम्प्युटर विभागातील अभिषेक उदनूर, प्रथमेश कोप्पे, वैष्णवी गोंदकर, ज्योती पाटील, रिशिका अथणे, ओंकार पाटील, शिवप्रसाद एकशिंगे, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलेकम्युनिकेशन विभागातील शुभम देसाई या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
सिमेन्स हि आंतरराष्ट्रीय जर्मन कंपनी आहे असून सीमेन्स ही युरोपमधील सर्वात मोठी औद्योगिक उत्पादन कंपनी आहे. औद्योगिक ऑटोमेशन आणि औद्योगिक सॉफ्टवेअरमध्ये जागतिक बाजारपेठेत आघाडीवर आहे. कंपनी ऑपरेशन्स प्रक्रिया आणि उत्पादन उद्योगांमध्ये ऑटोमेशन आणि डिजिटलायझेशन काम करते. कंपनी वितरित ऊर्जा प्रणाली, रेल्वे वाहतूक उपाय, आरोग्य तंत्रज्ञान आणि डिजिटल आरोग्य सेवा या क्षेत्रात पायाभूत सुविधा देते.
महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी स्पेशल अॅप्टीट्युड ट्रेनिंग, टेक्ऩिकल स्कीलचे वेगळे प्रशिक्षण तसेच मॉक इंटरव्ह्यु यासह टेक्निकल सेशन, व्हॅल्यू अॅडेड प्रोग्रॅम, कंपनी स्पेसीपीक ट्रेनिंग, अद्यावत तंत्रज्ञानाबाबत कंपनीतील व इंडस्ट्री क्षेत्रातील तंज्ञामार्फत मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबविले जातात. प्रोजेक्ट बेस लर्निंग अंतर्गत विद्यार्थ्यांना दुस-या वर्षापासूनच प्रोजेक्ट दिला जातो. तसेच तृतीय वर्षापासूनच अॅप्टीट्युड ट्रेनिंग, कोडींग लँग्वेज स्कील, माजी विद्यार्थांकडून मार्गदर्शन घेतले जाते. शेवटच्या वर्षी सहा महिने इंडस्ट्री इंटरशीप असते. या सर्वाचा उपयोग विद्यार्थ्यांना या कॅम्पससाठी झाला.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेलचे प्रा. नेहा सोनी, प्रा. अभिजित केकरे यांच्यासह सर्व डिन, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा