दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या चव्हाणवर कठोर कारवाई करण्याची मागणी
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
नाशिक येथील निमणी बसस्थानकाच्या बाहेर दोन समाजात जातील तेढ निर्माण होईल, असे मजकूर लिहून दंगल घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रथमेश संदीप चव्हाण याच्यावर ॲट्रासिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी येथील विविध आंबेडकरी संघटनेच्या वतीने येथील पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना निवेदनाद्वारे केली आहे. त्याच्यावर कठोर कारवाई न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी संजय शिंदे, सुनिल कुरुंदवाडे, धम्मपाल ढाले, अँड अनिरुद्ध कांबळे, दिनेश कांबळे, रमेश बिरणगे, मन्सूर मुजावर, संजय कुरुंदवाडे आदी उपस्थित होते.
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा