हेरवाडच्या सरपंप रेखा जाधव व त्यांची टीमने दिली जुने दानवाड ग्रामपंचायतीला भेट : ग्रामपंचायतीच्या वतीने राबवलेल्या शोषखड्डा प्रकल्पाचे केले कौतुक
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
जुने दानवाड ग्रामपंचायतीने शोषखड्डा अतिशय उत्तम रित्या राबविण्यात आल्याने, हेरवाड गावच्या सरपंच रेखा अर्जुन जाधव व त्यांची टीम पहाणी करून जुने दानवाड ग्रामपंचायतीचे कौतुक केले. यावेळी बोलताना त्या बोलताना म्हणाल्या की, शोषखड्डा प्रकल्प ग्रामपंचायतीने अतिशय चांगल्या पद्धतीने राबविले आहे. ज्या गावातील गटारीचे पाणी तुंबते किंवा निचरा होण्यास अडचण येते, अशा गावांनी माळभागावर शोषखड्डा प्रकल्प करावा, जेणेकरुन डासांची संख्या कमी होऊन कोणताही आजार व रोगराई पसरणार नाही नाही.
जिल्हा परिषदेच्यावतीने जो शोषखड्डा प्रकल्प आहे. तो शिरोळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी हा उपक्रम राबवावा, असेही त्या म्हणाल्या. व सरपंच राजेश्री तासगावे ग्रामपंचायतीचे कौतुकही केले. यावेळी ग्रामसेवक मोठे ,बंडू आंबुपे, प्रविण वडगावे,बापुसो बेडक्याळे, रघुनाथ कांबळे, बाळगोंडा पाटील, प्रविण पाटील, महावीर चौगुले, शालाबाई कोळी, सामाजिक कार्यकर्ते शिवराज तासगावे व हेरवाड ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा