पत्रकार महामंडळाच्या कार्याला गती ; व्हॉइस ऑफ मीडिया तर्फे पाठपुरावा
मुंबई / शिवार न्यूज नेटवर्क :
पत्रकारां साठी महामंडळाच्या निर्मितीसाठी वाईस ऑफ मीडियाने केलेल्या अनेक आंदोलन, उपोषण अशा प्रकारच्या लढ्याला यश आले असून पत्रकार महामंडळ निर्मितीच्या प्रक्रियेला शासन स्तरावर गती मिळालेली आहे.
पत्रकारांचे एकूणच कार्य पाहता, पत्रकारांचे हे महामंडळ कामगार विभागांतर गत निर्माण होणार असून यासंदर्भातल्या अटी शर्ती नियमावली तयार करण्यासाठी एक स्वतंत्र उपसमिती गठीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, या समितीत माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक उपसंचालक दर्जाचे अधिकारीही सदस्य म्हणून काम पाहतील.
व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संदीप काळे प्रदेशाध्यक्ष श्री अनिल मस्के मुख्य संयोजक तथा प्रदेश कार्याध्यक्ष श्री योगेंद्र दोरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि वारंवार मुख्यमंत्री महोदय, मंत्री शंभूराजे देसाई, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आदींकडे प्रत्यक्ष भेटून निवेदने देऊन पत्रकारांच्या महामंडळांची गरज लक्षात आणून याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे.
लवकरात पत्रकारांच्या महामंडळाच स्वरूप कसे असावे याबाबत पत्रकारांची व महासंचालक कार्यालयाची एक उपसमिती गठित करण्यात येऊन याबाबतची पुढील कार्यवाही समिती निश्चित करणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा