पुरपरिस्थितीत माणूसकीचे दर्शन
अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :
आपत्ती व्यवस्थापन व कुरुंदवाड नगरपरिषद अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या माणुसकीमुळे मजरेवाडी येथील एका रुग्णावर वेळेवर उपचार होऊन प्राण वाचले ही घटना रविवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान घडले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मजरेवाडी तालुका शिरोळ येथील मनोज बंडगर या रघुनाथ अचानक अस्वस्थ वाटू लागले मजरेवाडी कुरुंदवाड दरम्यान ही काही प्रमाणात रस्त्यावर पाणी होते त्यांच्या नातेवाईकांनी कसेतरी कुरुंदवाड गाठून रुग्णावर उपचार होण्यासाठी धावाधाव केली मात्र रविवार असल्याने सर्व दवाखाने बंद होते व कोणत्याही डॉक्टरांशी संपर्क होऊ शकला नाही अखेर हाताश होऊन ते शिवतीर्थ कुरुंदवाड येथे आले येथे चेक पोस्टवर कुरुंदवाड नगरपालिका आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन चालक करण आलासे अग्निशमन फायरमन हेमंत वायचळ यांनी अग्निशमन चे नितीन संकपाळ शरद गायकवाडहेमंत सावंत तुकाराम पवार असरार पटेल संतोष पाटील श्रीकांत बडोदे पाटील विजय पवार आदी च्या सहकार्याने रात्रीचा अंधार लाईट नाही त्यात शिवतीर्थावर तीन फूट तर दिनकर यादव फुलावर एक फूट पाणी अशा बिकट परिस्थितीत अग्निशमन गाडीमध्ये बसवून शिरोळ येथील एका खाजगी रुग्णालयात प्रचारासाठी वेळेवर दाखल केले यामुळे या रुग्णावर वेळेवर उपचार झाल्याने त्यांचे प्राण वाचले.
कुरुंदवाड नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या भयंकर महापुरात माणुसकीचे दर्शन घडवत एका रुग्णाचे प्राण वाचवले याबद्दल त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा