चिंचवाड येथे घराची पडझड, शेडचे नुकसान ; अतिवृष्टीचा ग्रामस्थांना फटका
उदगाव / शिवार न्यूज नेटवर्क :
चिंचवाड (ता. शिरोळ ) येथे संततधार सुरू असलेल्या पावसामुळे घराची पडझड झाली असून भिंत कोसळून शेजारील पंक्चर दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित आली आणि झाली नाही.
येथील पार्वती धोंडीराम नाईक यांच्या घराचे रात्री बाराच्या सुमारास भिंत कोसळली. ही भिंत शेजारी असलेल्या मोहन शामराव गोधडे यांच्या पंक्चर दुकानाच्या शेडवर पडल्याने मोठा आवाज झाला. आवाज ऐकून नागरिकांनी गर्दी केली होती. पडलेल्या खोलीच्या शेजारील खोलीतच पार्वती नाईक यांचा मुलगा मारुती नाईक व त्यांच्या पत्नी झोपल्या होत्या मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाकडून लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नाईक व गोधळे कुटुंबियातून होत आहे नाईक व गोधडे कुटुंबातून होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा