शिरढोण येथील पुराचे पाणी आल्यामुळे एकुण ४२ कुटुंब साहित्यासह स्थलांतर
हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क
शिरढोण येथील पुराचे पाणी घरात व घराभोवती आल्यामुळे नदीकाठी वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना व जनावरांना स्थलांतरित करण्यात आले.तर एकुण 42 कुटुंब साहित्यासह स्थलांतर झाले.त्यापैकी काही कुटुंब कन्या व कुमार शाळेत तर काही कुटुंब मित्र परिवार,पै-पाहुणे तसेच अन्य ठिकाणी असलेल्या स्वतःच्या घरात राहीले आहेत. पाणी पातळी हळूवार वाढत असल्याने अजून काही कुटुंबे स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत तसेच प्रशासनाने येथील गावभाग व माळभाग येथील जिल्हा परिषद शाळेत राहणे व जनावरे बांधण्याची सोय केली आहेत. प्रशासन मात्र पाण्याची वाट न बघता तत्काळ स्थलांतरित व्हा या भूमिकेत आहे. यासाठी सरपंच बाबासाहेब हेरवाडे उपसरपंच शक्ती पाटील सदस्य भास्कर कुंभार शशिकांत चौधरी आदीसह ग्रामपंचायत कर्मचारी काम करत आहेत.

चुकीची बातमी टाकली आहे माझी उपसरपंच चा नवरा सदयस होत नसतो कधी
उत्तर द्याहटवा