चिकोडीच्या नूतन खासदार प्रियांकाताई जारकीहोळी यांनी केली निपाणी पूर परस्थितीची पाहणी
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
काळम्मावाडी धरण पाणलोट क्षेत्रात होणारा मुसळधार पावसामुळे निप्पानी तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आणि पुर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चिकोडीच्या नूतन लोकप्रिय खासदार प्रियंकाताई सतिश जारकीहोळी यांनी निपाणी भागाचा पाहणी दौरा केला._यावेळी पुरग्रस्थ भागाची पाहणी करून लोकांच्या भावना जाणुन घेऊन त्यांना मानसिक धिर दिला.व आपण सदैव तुमच्या सोबत असल्याचे सांगितले. कर्नाटक राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सिद्धरामय्या व बेळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री,आमचे पिताश्री नामदार सतिश आण्णा जारकीहोळी यांच्या प्रयत्नाने तालुक्यांतील नुकसान पूरग्रस्त व शेतकरी यांना निधी प्राप्त करून देण्याचे अभिवचन प्रियांकाताई जारकीहोळी यांनी दिले.
यावेळी चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील,चिकोडी जिल्हा काँगेस उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, प्रतीक शहा, अमृत ढाले, अवधूत गुरव, निपाणचे तहसीलदार मुजफर बळीगार, चिकोडीचे डी वाय एस पी गोपाळ कृष्ण गौडा, सी पी आय बी एस तळवार,निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाचे पीएसआय शिवराज नाईकवाडी, बसवेश्वर पोलीस स्थानकाचे पीएसआय रमेश पवार, यांच्यासह तालुक्यातील अधिकारी ,नेते मंडळी,कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा