शिरटी - शिरोळ मार्गावर पाणी : रात्रीपर्यंत वाहतूक बंद होण्याची शक्यता



शिरटी / शिवार न्यूज नेटवर्क :

           गेल्या दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिली असली तरी राधानगरी व कोयना धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संत गतीने वाढ होत आहे. आज ( रविवार ) सकाळी शिरटी - शिरोळ मार्गावर मार्गावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. सध्या या पाण्यातूनच वाहतूक सुरू आहे. हे पाणी आणखी वाढल्यास महावीरनगर मार्गे कनवाड- शिरोळ रस्त्याने वाहतूक सुरू होईल. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे नागरिकांनी धीर धरला असला तरी धरणातील पाण्याचे विसर्गामुळे नागरिकांच्या मनामध्ये महापुराची धास्ती कायम आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष