दत्त कारखान्याच्या नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीसाठी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याचा निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यामुळे , कारखान्याचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी करता शुक्रवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक बोलवण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे सेक्रेटरी अशोक शिंदे यांनी दिली.
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यावरती उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या सत्ताधारी पॅनेलने सर्व 21 जागा जिंकल्या आहेत. गुरुवारी सायंकाळी उशिरा केंद्रीय सहकार खात्याच्या प्राधिकरणाने नूतन संचालकांच्या नावांना वैधता दिली आहे. यामुळे जिल्हाधिकारी यांनी विजयी उमेदवारांची यादी कारखाना कार्यस्थळावरती प्रसिद्ध केली आहे.
जिल्हाधिकारी यांनी निवडणूक प्रवीण निवडणुकीपूर्वी स्थगित केलेली विशेष सभा पूर्ण करण्याकरता तसेच अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी करता नूतन संचालकांची विशेष बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी सकाळी 11 वाजता बोलवण्यात आली असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
दरम्यान कारखान्याच्या अध्यक्षपदी गणपतराव पाटील यांची पुन्हा वर्णी लागण्याची शक्यता असून उपाध्यक्षपदी कोणाला संधी मिळते याची उत्सुकता लागून राहिली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा