बेळगांव जिल्ह्यातील शाळांना २५ व २६ रोजी सुट्टी जाहीर



अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :         

     बेळगाव जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून बेळगाव जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जाणे अवघड होणार असल्याची दखल घेऊन बेळगावच्या जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी विद्यार्थ्यांना उद्या गुरुवार दिनांक 25 जुलै आणि शुक्रवार दि. 26 रोजी दोन दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव, बैलहोंगल, खानापूर, कित्तूर, चिक्कोडी, निप्पाणी तालुक्यातील शाळांना २५ जुलै आणि २६ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. यामध्ये अंगणवाडी प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा यांचा समावेश आहे. संबंधित आदेश सर्व अनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षण संस्थांना लागू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. एकंदर गेल्या आठवड्या पासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे,शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आले आहे.       

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष