हेरवाड - घोसरवाडचा संपर्क तुटला
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच धरण क्षेत्रातून विसर्ग होणाऱ्या पाण्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे हेरवाड - घोसरवाड मार्गावर पुराचे पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. हेरवाड मध्ये सुतार वस्तीत काल महापुराचे पाणी आल्याने तेथील नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. त्याचबरोबर येथील कन्याशाळे मागे असणाऱ्या इटाज गल्ली, बंडगर गल्ली आदी ठिकाणचे नागरिक पुराचा धोका ओळखून स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा