गौरवाड - गडगले-जाधव मळा व्हाया - कवठेगुलंद रस्ता पाण्याखाली
अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर कमी झाला असला तरी कृष्णा - पंचगंगेच्या पातळीत सतत वाढ होतच आहे. आज शनिवारी सांयकाळी सात वाजता गौरवाड...गडगले..जाधव मळा व्हाया कवठेगुलंदला जोडणार्या रस्त्यावर पाणी आले आहे. गौरवाड- कवठेगुलंद रस्त्यावर पाणी आल्याने दोन्ही गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. तरीही सद्या या रस्त्यावरील पाण्यातुनच वाहतुक सुरु असली तरी पाणी पातळी याच गतीने वाढत राहील्यास रात्रीनतंर कधीही हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होईल. दरम्यान पुराचा धोका ओळखुन गडगले - जाधव मळ्यात वस्ती करुन असलेली कुटुंबे स्थंलातर केली आहेत. यामध्ये रावसाहेब गडगले,तानाजी नारे,प्रकाश नारे,रवी नारे,नितीन नारे,महावीर कोले,आदी कुटुंबे आपल्या प्रांपचिक साहित्य व जनावरांसह सुरक्षित ठिकाणी आपल्या पै-पाहुणे...नातेवाईक यांच्याकडे स्वतःहुन स्थंलातर झाली आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा