गणेशवाडी - कागवाड रस्त्यावर पुराचे पाणी


अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी कागवाड दरम्यानच्या रस्त्यावर आज रविवारी दूपारी पुराचे पाणी आले. या रस्त्यावर दीड ते दोन फुट पाणी असुन सद्या पुराच्या पाण्यातुनच वाहतुक सुरु आहे. गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिली असली तरी कृष्णेचे पाणी पातळीत अजुनही सतत वाढ होत आहे. यामुळे आज गणेशवाडी कागवाड रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे. महाराष्ट्र -कर्नाटकला जोडणारा हा आंतरराज्य मार्ग आहे.या मार्गावर पुराचे पाणी आणखी वाढल्यास या रस्त्यावरील वाहतुक शेडशाळ मगदुम मळा कातरकट्टी रस्ता व्हाया कागवाड अशी होऊ शकते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष