बस्तवाडला पुराचा विळखा ; गावातील सत्तर टक्के लोक स्थंलातर
अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील कृष्णा पंचगंगा संगम घाटाजवळचे सर्वात पहिले गाव असणार्या बस्तवाडला पुराचा विळखा पडला आहे. आज सकाळी कुरुंदवाड - बस्तवाड मार्ग पाण्याखाली गेला आहे तर उद्या सकाळपर्यंत बस्तवाड - अकिवाट मार्ग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. याधर्तीवर गावातील एकुण लोकसंख्येच्या सत्तर टक्के लोक स्वतःहुन व प्रशासनाच्या सुचनेनूसार प्रांपचिक साहित्य व जनावरासह सुरक्षित ठिकाणी स्थंलातर केले आहेत. पुराचा सर्वात जास्त फटका शिरोळ तालुक्यातील बस्तवाडला बसतो. दरम्यान अकिवाट बस्तवाड रस्त्याला पाणी येऊन लागले आहे. पाण्याची पातळी याच गतीने वाढत राहील्यास बस्तवाडला बेटाचे स्वरुप येणार आहे. यामुळे आज या गावाला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर , तहसिलदार अनिलकुमार हेळकर व गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी भेट देऊन पुरस्थितीची पाहणी केली व ग्रामस्थानी सतर्क राहुन सुरक्षित ठिकाणी स्थंलातर होण्याच्या सुचना केल्या. दरम्यान बस्तवाडचे सरपंच अम्माजान नुरपाशा पाटील,सर्व सदस्य,ग्रामसेवक महालिंग अकिवाटे,तलाठी अभिजीत पाटील,पोलीस पाटील सुखदेव कोळी,सामाजिक कार्यकर्ते जाफरभाई पटेल यांच्यासह गावातील तरुण मंडळे पुरस्थितीवर सतत लक्ष ठेऊन आहेत. तसेच प्रशासनाच्या सुचनेनुसार ग्रामस्थांना स्थंलातर करण्यास मदत करीत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा