उदगावात पाणी आल्याने सांगली-कोल्हापूर बायपास महामार्ग बंद
उदगांव / शिवार न्यूज नेटवर्क :
सांगली कोल्हापूर बायपास महामार्गावरील उदगाव (ता. शिरोळ) येथील टोल नाक्याजवळील कृष्णा नदीच्या पुराचे पाणी आल्याने गुरुवारी रात्री आठच्या सुमारास बायपास महामार्ग बंद करण्यात आला. त्यामुळे सांगली कोल्हापूर महामार्गावरील सर्व वाहतूक उदगाव-जयसिंगपूर मधून वळविण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कृष्णा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गुरुवारी रात्री उदगाव येथील टोल नाक्याजवळ बायपास महामार्गावर असलेल्या ओढयाला कृष्णा नदीचे पाणी आल्याने जयसिंगपूर पोलीस गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास बायपास महामार्ग बॅरिगेट लावून बंद केला. तर तमदलगे बाजूने बायपास महामार्गावर रेल्वे स्टेशन जवळ हे डायरेक्ट लावण्यात आले. त्यामुळे सांगली कोल्हापूर महामार्गावरील सर्व वाहतूक उदगाव जयसिंगपूर मार्गे वळविण्यात आली आहे. सन 2021 रोजी आलेल्या महापुरापूर्वी 23 जुलै रोजी ओढ्यावर पाणी येऊन बायपास महामार्ग बंद झाला होता.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा