पूरग्रस्त, जनावरांसाठी तातडीने छावण्या सुरू करा : राकेश खोंद्रे
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यामध्ये पूर परिस्थिती गंभीर बनत आहे. प्रशासनाने तातडीने पुरग्रस्तांसह जनावरांसाठी छावण्या सुरू करून युद्धपातळीवर मदत कार्य सुरू करण्याची मागणी युवा सेना जिल्हा प्रमुख राकेश खोंद्रे यांनी केली आहे. याबाबत शिरोळचे नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांची शुक्रवारी (ता.२५) भेट घेऊन त्यांनी पुरस्थितीची माहिती देऊन तातडीने गावागावात मदत कार्य सुरू मागणी केली.
श्री खोंद्रे म्हणाले, सध्या तालुक्यात नद्यांचे पाणी गावात येण्यास प्रारंभ झाला आहे. ज्या ठिकाणी धोका जास्त आहे त्या ठिकाणी स्थलांतर करणे गरजेचे आहे. जनावरे सुरक्षित ठिकाणी नेऊन त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. नागरिकांनाही सुरक्षितस्थळी नेण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच कार्यवाही सुरू करावी. अचानक पाणी वाढल्यास नागरिकांचे मोठे हाल होणार आहेत.
नागरिकांचे जेवण, औषध यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. स्थलांतर करण्यासाठी अनेक वाहनधारक नागरिकाकडून मोठ्या प्रमाणात भाडे आकारतात यावरही प्रशासनाने आरटीओमार्फत अंकुश ठेवण्याची मागणी श्री खोंद्रे यांनी यावेळी केली. युवा सेना पूर परिस्थितीत कोणतीही सेवा देण्यास तयार असल्याचे श्री खोंद्रे यांनी स्पष्ट केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा