औरवाड उपसरपंचपदी अफसर पटेल यांची बिनविरोध निवड

 


 अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :

              शिरोळ तालुक्यातील औरवाड ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी अफसर पटेल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच शफी पटेल होते.

      विशाल दुग्गे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रोटेशन नुसार आज ग्रामपंचायत सभागृहात उपसरपंच निवड करण्यात आली. यावेळी अफसर पटेल यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन उपसरपंच अफसर पटेल यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून गावातील प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी उपसरपंच दादेपाशा पटेल, सईद पटेल, तन्वीर बहादूर,  यासीन बहादूर , विजय दुग्गे ,अण्णा कांबळे ,जाकीर पटेल,  मुस्ताक पटेल ,जमील पटेल  ,   जक्की पटेल ,एम जी पटेल , वंदना गावडे, नारायण गावडे ,दिलीप मंगसुळे , रमेश रावण ,फैसल पटेल ,आदी  ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष