दानोळी - कवठेसार मार्गावर पुराचे पाणी ; मार्ग वाहतुकीसाठी बंद

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने दानोळी कवठेसारचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे कवठेसारमधील अनेक ग्रामस्थ आपल्या जनावरांसह इतर ठिकाणी स्थलांतर करण्याच्या मार्गावर आहेत. 

शिरोळ तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे आणि धरण पाणलोट क्षेत्रातून विसर्ग होणाऱ्या पाण्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. काल गुरुवारी दानोळी - कोथळी हा मार्ग पाण्याखाली गेला होता पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने दानोळी - कवठेसार हा मार्गही आज पहाटेच्या वेळी पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष