जि. प. प्राथमिक शाळेला कोण शिक्षक देता का शिक्षक

सुनिल दावणे / शिवार न्यूज नेटवर्क :

गडहिंग्लज तालुक्यातील पूर्व भागातील ऐतिहासिक निसर्गरम्य किल्ले सामानगडाच्या पायथ्याशी वसलेल्या नौकुड येथिल जि. प. प्राथमिक शाळेला कोण शिक्षक देता का शिक्षक म्हणण्याची वेळ आली आहे.

गेल्या तीन ते चार वर्षापासून शिक्षकांवर चालणारी जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा या शाळेत पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असून हलकर्णी पूर्व भागातील अत्यंत दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नौकुड गावातील मुलांची शाळा शिकायची की नाही अशी वेळ आली आहे.

डोंगरी भाग असल्यामुळे शेतात पिकत नाही आणि पिकलेच तर जंगली प्राणी ती पिक ठेवत नाहीत या जंगली प्राण्यांसाठी सुद्धा कोल्हापूर जिल्ह्याचे DFO साहेब यांना पत्राद्वारे माहिती दिली पण पर्याय काय निघाला नाही.

त्यामुळे गावातील 50 ते 60 टक्के वर्ग मुंबई पुणे या ठिकाणी स्थलांतरित झाला आहे. त्यामुळे शाळेत विद्यार्थी कमी आहेत म्हणून शिक्षक नाहीत आणि पालकांचे मत आहे की जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक नाहीत म्हणून विद्यार्थी नाहीत यामुळे पालक मुलांना शहरात शाळेसाठी पाठवत आहेत.

नौकुड हे गाव तालुक्यापासून १५ किलो मीटर अंतारावर आहे. डोंगरी भागातील गाव म्हणून नौकुड गावची ओळख आहे. त्यामुळे गावातील मुलांना शाळेसाठी तालुक्याची ठीकाणी पाठवणे सुद्धा पालकांना शक्य नाही.

आज सुद्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत फक्त आणि फक्त तीन शिक्षक आहेत. पहिली ते आठवी वर्ग असे आठ वर्ग आहेत. तीन शिक्षकातील एक शिक्षक शासनाने त्यांच्यावर दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी तालुक्यात मग दोन शिक्षक आठ वर्गातील मुलांना काय शिकवणार? आणि खेड्यातील मुलांनी शिक्षण घ्यायचे की नाही एकदा आम्हाला सांगा असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

वेळेत शिक्षक न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असे इशारा दिला आहे


शिवार न्युजसाठी प्रतिनिधी सुनिल दावणे गडहिंग्लज

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष