राज्यस्तरीय लोकशाहीर आण्णाभाऊ साठे समाजगौरव पुरस्कार संपादक रविराज ऐवळे यांना जाहीर

 १ ऑगस्ट ला पत्रकार भवन पुणे येथे होणार वितरण 



जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

           कोल्हापूर जिल्ह्यातील अग्रगण्य दैनिक अप्रतिम या वर्तमानपत्राचे संपादक रविराज कृष्णा ऐवळे यांना यंदाचा राज्यस्तरीय लोकशाहीर आण्णा भाऊ साठे पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकशाहीर आण्णा भाऊंच्या जयंतीनिमित्त या पुरस्काराचे 1 ऑगस्ट 2024 रोजी पत्रकार भवन पुणे येथे देशाच्या 1971 च्या युद्धामध्ये सेवा बजावलेले निवृत्त कर्नल मा.श्री सुरेश पाटील, पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक मा.श्री फिरोज मुल्ला सर, व मा. श्री. संतोष आठवले यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. 

              दैनिक अप्रतिम च्या माध्यमातून श्री रविराज ऐवळे यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्यातील पँथर आर्मी स्वराज्य क्रांतीसंघटना यांच्या वतिने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यंदा हा पुरस्कार विविध मान्यवरांना जाहीर झाला असून कोल्हापूर जिल्ह्यातून रविराज ऐवळे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार आमच्यासाठी प्रेरणादायी व प्रोत्साहन देणारा असेल, असे मत संपादक रविराज ऐवळे यांनी हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष