माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्या कार्यकर्त्यांकडून पूरस्थितीची पाहणी
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
गेल्या आठ दिवसापासून काळम्मावाडी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलेला असून अंतर्गत येणाऱ्या सर्व नद्यांना महापूर आलेला असून अनेक मार्ग बंद झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर , माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व निपाणीच्या विद्यमान आमदार,माजी मंत्री सौ शशिकला जोले कार्यकर्ते व बिरेश्वर को ऑप क्रेडिट सोसायटीचे संचालक श्री अप्पासाहेब जोल्ले व हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पवन पाटील व संचालक श्रीकांत बंने, संचालक शरद जंगठे व पदाधिकारी यांनी बोरगाव येथील दूधगंगा नदीवर आलेल्या महापुर परिस्थितीचा पाहणी दौरा केला. *. निपाणी सह परिसरातील सर्वांची जीवनदायी ठरलेली काळम्मावाडी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पावसाने दुधगंगा सह अनेक नद्यांनी रौद्ररूप धारण करून महापुराचे परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर आण्णा वाहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली एकसंबा येथील बिरेश्र्वर क्रेडिट सोसायटी या मुख्य शाखेचे संचालक व निप्पानी येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक श्री अप्पासाहेब जोल्ले, निपाणी येथील हाल सिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पवन पाटील, संचालक श्रीकांत बॅने ,संचालक शरद जंगठे व कार्यकर्ते यांच्या वतीने निपाणी भागातील महापूर आलेल्या पूर परिस्थितीची आज पाहणी केली . निपाणी विधानसभा क्षेत्रातील मांगुर, कुन्नूर बारवाड, मानकापूर, शिरदवाड व बोरगाव या ठिकाणी पूर परिस्थिती व पाण्याखाली गेलेल्या पिकांची पाहणी करून संबंधित नुकसान ग्रस्त नागरिकांशी संवाद साधून व अधिकाऱ्यांना नोंद करण्यासाठी आवाहन केले. यावेळी बिरेश्र्वर संचालक अप्पासाहेब जोल्ले, हालसिदनाथ साखर कारखाना उपाध्यक्ष पवन पाटील, संचालक श्रीकांत बने,संचालक शरद जंगठे,जितेंद्र पाटील, जिंनु पाटील,अमित माळी, देव माळी,दर्शन पाटील,धनपाल खोत ,शेसू आयिद माले,रमेश पाटील, शिवाजी भोरे,फिरोझ अफराज,वसंत गजरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा