शिरढोण मध्ये कृष्णा जलवाहिनीला लागली भली मोठी गळती
हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरढोण गावामध्ये कृष्णा पाईप लाईन योजनेला मायगोंडा ऐनापुरे यांच्या घरासमोर मोठे लिकेज झाल्यामुळे गावातील व माळावरील पाणी पुरवठा किमान तीन दिवस तरी बंद राहणार आहे. सर्वाांनी पिण्याचे पाणी जपून वापरावे अशी विनंंती ण ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
शिरढोण ग्रामपंचायतीच्या पाण्याची पाईप लाईन बस्तवाड रोड वर दुरुस्ती सुरु असल्याने शिरढोणच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐन महापुरात गंभीर बनला आहे. गेल्या महिन्यापासून सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी वारंवार भेटून नवीन पाईप लाईन करून देण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार भेटून माहिती दिली होती. यावेळी नवीन पाईप लाईन बसवून देतो असे आश्वासन दिले होते परंतू अद्यापपर्यंत काम पूर्ण केलेले नाही. त्यामुळे ऐन महापुरात नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा