पुणे न्यूज एक्स्प्रेस तर्फे सौ. महाबुब उस्मान मुजावर यांना आदर्श समाज सेविका पुरस्कार जाहीर



हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरढोण गावातील एका सर्वसामान्य कुटुंबातील सौ. महाबुब उस्मान मुजावर यांना पुणे न्यूज एक्स्प्रेस तर्फे आदर्श समाज सेविका पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.महाबुब मुजावर यांनी अनेकांची मदत केली आहेत.त्यांनी काही वर्षांपुर्वी शिरढोण येथे अवकाळी मुसळधार पावसामुळे शिरढोण परिसरातील अनेक ऊसतोड मजुरांचा संसार अक्षरशः पाण्यात बुडाला होता.त्यामुळे पावसात भिजत थंडीत कुडकुडत ऊसतोड मजुरांनी आपल्या लहान मुलाबाळांसह रात्र जागुन काढली.त्यावेळी केवळ हळहळ व्यक्त न करता शिरढोण येथील सर्वसामान्य कुटुंबातील महाबुब उस्मान मुजावर यांच्या कुटुंबीयांसमवेत ऊसतोड मजुरांच्या कुटुंबियांना एक घास संवेदनेचा या प्रमाणे गावातील सर्वच ऊसतोड मजुरांच्या कुटुंबियांना एक वेळेस जेवण देऊन त्यांचे पावसात भिजलेली साहित्य स्थलांतरित करण्यास मदत करत सामाजिक बांधिलकी जपली.२०१९ मध्ये कोरोना सारख्या काळात देखील अनेकांना मदत केली.२०२१ मध्ये महापुराच्या पाण्यामुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली होतीत पण या वेळी देखील एक पाऊल पुढे टाकत आपले कार्य करीत सामाजिक बांधिलकी जपली.यांच्या या कार्याची दखल घेत यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात आले त्याच बरोबर पुणे न्यूज एक्स्प्रेस तर्फे या वर्षीचा आदर्श समाज सेविका पुरस्कारासाठी देखील निवड करण्यात आली.हा पुरस्कार दिनांक २५ आॅगस्ट २०२४ रोजी कोल्हापूर येथे शाहु स्मारक येथे संपन्न होणार आहे.अशी माहिती पुणे न्यूज एक्स्प्रेसचे संपादक मेहबूब सर्जेखान यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष