समाज प्रबोधनात्मक गणेशोत्सव साजरा करा : डॉ रोहिणी सोळंके

 बाल गजराज शिरोळ हालसिद्धनाथ हरोली गणराया अवार्डचे मानकरी


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यात गणेशोत्सव साजरा करीत असताना सार्वजनिक तरुण मंडळांनी नेहमीच समाजाला दिशा देणारे उपक्रम राबवत व कायदा आणी सुव्यवस्था अबाधित राखण्याचा आदर्श निर्माण केला आहे यावर्षीही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी समाज प्रबोधनात्मक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन जयसिंगपूर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांनी केले.

येथील शिरोळ पोलीस ठाणे व शिरोळ शहर श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आयोजित श्री गणराया अवार्ड 2023 वितरण आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची बैठक या संयुक्त समारंभाच्या प्रमुख पाहुण्या डॉ रोहिणी सोळंके यांनी उपस्थित तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

या समारंभात शहरी विभागात श्री गणराया अवार्ड प्रथम क्रमांक - बाल गजराज गणेशोत्सव मंडळ कोळी गल्ली, द्वितीय क्रमांक अजिंक्यतारा गणेशोत्सव मंडळ, तृतीय क्रमांक हनुमान गणेशोत्सव मंडळ गावडे गल्ली उत्तेजनार्थ बाजारपेठ गणेशोत्सव मंडळ शिरोळ यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले ग्रामीण विभागात प्रथम हालसिद्धनाथ गणेशोत्सव मंडळ हरोली द्वितीय हिंदू मुस्लिम गणेशोत्सव मंडळ घालवाड तृतीया राम रहीम गणेशोत्सव मंडळ घालवाड उत्तेजनार्थ सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळ शिरटी यांना प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या समारंभात बोलताना तहसीलदार अनिलकुमार हेळकर म्हणाले की सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करत असताना शासनाने घालून दिलेल्या अटी आणि नियमांचे तंतोतंत पालन करावे कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही अनुचित घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड बोलताना म्हणाले की शिरोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत जवळपास 264 हून अधिक गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सव साजरा करीत असतात गणेशोत्सव साजरा करत असताना मंडळांनी धर्मादाय कार्यालयाकडून नोंदणी करून घ्यावी पोलीस ठाण्याकडून गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी घ्यावी मंडप घालताना वाहतुकीला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी वर्गणी मागत असताना कोणावरही सक्ती करू नये कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी गणेशोत्सव काळात श्री गणरायाच्या रक्षणासाठी नियमितपणे त्या ठिकाणी दोन स्वयंसेवकांची नेमणूक करावी सामाजिक शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच या काळात रक्तदान वृक्षारोपण शैक्षणिक साहित्याचे वाटप यासह अन्य समाजोपयोगी उपक्रम राबवावेत ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी समाजाला दिशा देणारे देखावे सादर करावेत आणि यावर्षीचा गणेशोत्सव कायदा सुव्यवस्था अबाधित राखत समाज प्रबोधनात्मक साजरा करण्याचे आवाहन केले.

विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी दीपक जमणे यांनी यावेळी गणेशोत्सव काळात विजेच्या वापराविषयी मार्गदर्शन केले.

शिरोळ शहर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष डी आर पाटील प्रास्ताविकात बोलताना म्हणाले की गेल्या वर्षी अनेक तरुण मंडळांनी चांगले देखावे सादर करून अनेक सामाजिक उपक्रम राबवले पण त्या मंडळांनी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत डॉल्बी लावल्यामुळे ती मंडळ आपोआप या गणराया अवॉर्ड स्पर्धेतून बाद झाली यामुळे तरुण मंडळांनी डॉल्बीचा वापर न गणेशोत्सव साजरा करावा समाजात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत गेल्या वर्षी शहरी आणि ग्रामीण अशा दोन विभागात ही स्पर्धा घेऊन चांगल्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची निवड केल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ अतुल पाटील ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष बजरंग काळे कनवाडचे इनामदार नांदणीचे प्रल्हाद आंबी यांनी मनोगत व्यक्त केले पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब माळी यांनी स्वागत केले सचिव डॉ दगडू माने यांनी सूत्रसंचालन केले यावेळी पत्रकार संघाचे सदस्य चंद्रकांत भाट बाळासाहेब कांबळे पोलीस हवलदार राजेंद्र ओमासे यांच्यासह शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक तरुण मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध गावचे पोलीस पाटील पोलीस मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला यांनी आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष