बदलापूर अत्याचार प्रकरणी कुरुंदवाड मध्ये शिवसेनेचे आंदोलन



 कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

        बदलापुरात शाळकरी चिमुकलीवर झालेल्या लैगिक अत्याचारप्रकरणी शिरोळ तालुका शिवसेना(उबाठा)तर्फे निदर्शने केली.शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल करत घटनेचा तीव्र निषेध केला.या प्रकरणांमध्ये राजकारण न करता जलद न्याय मिळावा अशी मागणी केली.

      कुरुंदवाड येथील दर्गा चौकात बदलापूर घटनेच्या निषेधार्थ जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली.सरकारवर हल्लाबोल केला. सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता.

        यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख उगळे म्हणाले देशातील निष्क्रिय गृह खात्यामुळे कोलकत्ता येथे महिला डॉक्टरवर अत्याचार झाले.आणि बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली.यावरूनच महाराष्ट्र राज्य सरकारही निष्क्रिय आहे.ही जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

        यावेळी बोलताना माजी तालुकाप्रमुख मालवेकर म्हणाले लाडकी बहीण फक्त पोस्टर्सवर सुरक्षित ठेवणारे खोके सरकार प्रत्यक्षात बहिणींची सुरक्षा करण्यात अपयशी ठरले आहेत. बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर या सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही.मात्र या सरकारने कोणतेही राजकारण न करता त्या नराधमांच्यावर वरिष्ठ न्यायाधीश नेमून या खटल्याचा जलदगतीने तपास करून शिक्षा करावी अशी मागणी केली.

       यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख युवराज घोरपडी प्रतीक धनवडे बाबासाहेब सावगाव संजय अनुसे साजिदा गोरी वैशाली जुगळे आदींनी निषेधात्मक भाषणे केली.

     यावेळी अण्णाप्पा आवळे, सुहास पासोबा,रामभाऊ माळी,बाबासाहेब गावडे, राजेंद्र बेले, अनिकेत बेले, स्वप्निल चव्हाण, गणेश गुरव, रफिक मुल्ला, आप्पासाहेब गावडे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष