कोल्हापुर हादरले.. शिये येथे दहा वर्षांच्या मुलीचा खून
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
कोल्हापुरातील शिये गावातील राम नगर परिसरातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोल्हापुरात दहा वर्षांच्या मुलीची हत्या झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुलीवर अत्याचार झाल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. ही मुलगी बुधवार दुपारपासून बेपत्ता होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
आज गुरुवारी महायुतीचा लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात मोठा तणाव निर्माण झालेला आहे. १० वर्षीय मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश करण्यास सुरुवात केली. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा