शिरढोण गावातील महापुरामुळे व केमिकल मिश्रित पाण्यामुळे पिक नुकसान झालेल्या लाभार्थींना १०० टक्के नुकसान भरपाई देण्याची मागणी
हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
मौजे शिरढोण येथे महापुराचा फटका सर्वसामान्य गोरगरिबांना, नागरिकांना 2005,2019 व 2021 आलेल्या महापुरामुळे शिरढोण गावातील नागरिकांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.तरी यावेळी सन 2024 मध्ये होत असलेल्या महापुरामध्ये पहिल्या दिवशी आलेल्या महापुराने केमिकल मिश्रित घाण पाणी काळीकुट्ट आणि आमच्या घरामध्ये व नव्या पिकांमध्ये भयानक दुर्गंधीयुक्त सध्या आहे त्यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता आहे.गावामध्ये 17 दिवस पुराची पाणी साठवून उभी पिके नष्ट झालेली आहेत. तरी पुरामुळे होणारे नुकसान शासनाच्या निदर्शनास आनंद देण्यासाठी शुक्रवारी दि.02/08/2024 शिरढोण येथील नागरिकांनी गाव चावडी समोर ठिय्या मांडून संबंधित महसूल खात्यांना आमच्या मागण्या मान्य करणे करता दोन दिवसाची मुदत देण्यात आली होती. यासाठी दोन दिवसानंतर सोमवार दि.05/08/2024 रोजी हजारो पूरग्रस्त नागरिक गाव चावडी समाज दिनदर्शनीकरण दिलेल्या मागण्या संदर्भात जाब विचारण्यात आला. पण संबंधित महसूल अधिकारी तहसीलदार व पोलीस उपनिरीक्षक यांनी मध्यस्थी करून शासनाकडून मिळणारी मदत देण्यात येईल असे सांगून आंदोलन थांबविण्यात आले.आज रोजी पूरग्रस्त परिस्थिती हाताळण्यामध्ये शासकीय कर्मचारी अक्षम्य दुर्लक्षाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात व अन्य विभागाकडे शासकिय कर्मचाऱ्यांच्या विरोधात व निवेदन देण्यात आले.यावेळी सुरेश सासणे, आंदोलक सम्राट विश्वास बालिघाटे, सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा