कोथळी परिसरात लम्पी आजाराने १६ जनावरे बाधित ; एका जनावराचा मृत्यू



कोथळी / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यात लम्पीने बाधित होणाऱ्या जनावरांची संख्या वाढत आहे. सोमवारी रात्री कोथळी येथील राजकुमार पाटील-भोसेकर यांचे एक जनावर लंपिने दगावले. कोथळी येथे ९ आणि  उमळवाड येथे ७ अशी एकूण पंधरा दिवसात १६ जनावरे बाधित झाली होती . पण योग्य खबरदारी आणि औषध उपचाराने ही जनावरे लंपी आजारातुन बरी झाली आहेत  .अशी माहिती पशुधन विकास अधिकारी डॉक्टर जितेंद्र कुरुंदवाडे यांनी दिली.

लम्पी स्कीन आजाराने शिरोळ तालुक्यात पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंतेत आहेत.

 मागील वर्षी संपूर्ण राज्यभरात जनावरांवर लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाला होता. मोठ्या प्रमाणावर जनावरे देखील दगावली होती. लम्पी आजाराचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर जनावरांचे लसीकरण करण्यात आले होते. आता पुन्हा लम्पी आजाराने बाधित जनावरांची संख्या वाढत आहे.लंपी आजाराची लक्षणे आढळल्यास कोथळी व परिसरातील शेतकऱ्यांनी मोबा क्र . ९०७५०१५२४९ या क्रमांकावर संपर्क साधावा व त्वरित उपचार करून घ्यावेत असे आवाहन डॉक्टर जितेंद्र कुरुंदवाडे यांनी केले आहे .    लंम्पी आजाराबाबत दक्षता व उपायोजना याची माहिती देताना डॉक्टर जितेंद्र कुरुंदवाडे म्हणाले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष