अद्यावत कौशल्यांचा उपयोग स्वत:चा उद्योग उभारण्यासाठी करावा अनिल बागणे : प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत

 


यड्राव / शिवार न्यूज नेटवर्क :

      ''मुलांना उद्योजक बनविण्यासाठी व चांगल्या कंपन्यात नोकरी मिळाव्यात ह्या उद्देशाने महाविद्यालय इंडस्ट्रीयल ट्रेनिंग व इंटर्नशीपचा समावेश करीत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासोबत औद्योगिक पूरक कौशल्य शिकावे. ह्या अद्यावत कौशल्याचे उपयोग स्वत:चा उद्योग उभारण्यासाठी, चांगल्या कंपनीत नोकरी व जीवनात यशस्वी बनण्यासाठी होणार आहे." असे प्रतिपादन शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजीचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी केले. ते यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थी स्वागत समारंभात बोलत होते.

श्री. बागणे म्हणाले, '' जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा असतो. तो आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी शरद पॉलिटेक्निकमध्ये विविध कौशल्ये व आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येते. औद्योगिक क्षेत्रात आवश्यक असणारे तंत्रज्ञान, कौर्सेसही महाविद्यालयात सुरु करण्यात आले आहे. तसेच जीवनात यशस्वीतेसाठी शॉर्टकट नाही, प्रामाकणिकपणा व प्रचंड कष्ट आणि त्याचबरोबर व्यक्तीमत्वातील नम्रता हे गुण अंगीकारला तर यश हमखास मिळतं. शिक्षण संस्था ह्या फक्त शिक्षणाचीच मंदिरे नसून ती संस्काराचीही मंदिरे आहेत. हा संदेश शरद पॅटर्न देतो. प्रत्येकाने आपल्या आई, वडील व शिक्षकांचा आदर राखला पाहीजे. ''

दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एस. ताशीलदार यांनी महाविद्यालयची माहिती दिली. प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा. के.डी. आगलावणे यांनी विभागाची माहीती देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी प्रवेश घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सर्व डिन, विभाग प्रमुख याच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थीत होते. आभार प्रा. सौ. एस.पी. सरदेसाई यांनी मानले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष