डॉ.जे.जे. मगदूम फार्मसी महाविद्यालयाचा औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमाचा अंतिम वर्षाचा १०० टक्के निकाल
प्रल्हाद साळूंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
डॉ. जे.जे. मगदूम ट्रस्ट चे डॉ. जे.जे.मगदूम फार्मसी कॉलेज जयसिंगपूर च्या शैक्षणिक वर्ष 2023- 24 औषध निर्माण शास्त्र अंतिम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून उज्वल यशाबरोबरच शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवून औषध निर्माण शास्त्र क्षेत्रात बाजी मारली आहे.
यंदाच्या अंतिम वर्षातील परीक्षेत डॉ. जे.जे. मगदूम फार्मसी कॉलेज ,जयसिंगपूर येथून एकूण 112 विद्यार्थी परीक्षेत बसले होते सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
या परीक्षेसाठी डॉ. जे. जे. मगदूम फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.शितलकुमार पाटील, शैक्षणिक समन्वयक डॉ. सतीश किलजे व सर्व प्राध्यापकांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
तसेच डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व व्हाईस -चेअर पर्सन अॅड.डॉ. सोनाली मगदूम यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा