दीक्षाभूमी नागपूर येथे विजय दशमी ला जाण्यासाठी कर्नाटक सरकार कडून आवाहन ; प्रवास खर्च मोफत

अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

बोधीसत्व, महामानव ,विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी नागपूर येथे लाखो अनुयायांच्या उपस्थितीत १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी विजय दशमी च्या शुभमुहूर्तावर विज्ञानवादी बौद्ध धर्म स्वीकारला होता. या अनुषंगाने आज जगात तो दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करतात. कर्नाटक सरकारच्या समाज कल्याण खात्याकडून येत्या १२ ऑक्टोबर विजय दशमीला नागपूर येथील दीक्षाभूमी जाण्यासाठी राज्यातील बौद्ध उपासक उपासिका या अनुयायांना मोफत विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे.  

      ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. राज्यातील बौद्ध उपासकानी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाने तर्फे करण्यात आले आहे. *. १४ ऑक्टोंबर १९५६ पासून प्रतिवर्षी नागपूर येथील दीक्षाभूमी येथे विजया दशमी दिवशी जगातील लाखो बुध्द अनुयायी दर्शनासाठी येत असतात, कर्नाटक सरकारचे लोकप्रिय समाज कल्याण मंत्री नामदार महादेव आप्पा यांनी दोन ऑगस्ट रोजी विधिमंडळ येथील अधिकाऱ्यासमवेत बैठक घेऊन येणाऱ्या १२ ऑक्टोंबर २०२४ तारखेला विजय दशमी दसऱ्याला जाण्यासाठी राज्यातील बौद्ध अनुयायांसाठी मोफत अशी बस प्रवासचे आयोजन करण्यात आले आहे. एकंदर १० ऑक्टोंबर ते १४ ऑक्टोंबर असे प्रवासाची दिशा आहे.राज्यातील प्रत्येक जिल्ह्या तील संघटनेमार्फत व विशेषता समाज कल्याण मार्फत बौद्ध अनुयायांना नागपूर येथील दीक्षाभूमी ला जाण्यासाठी येणाऱ्या ३१ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. राज्यातील काँग्रेस सरकारने जनतेसाठी अनेक जीवनदायी योजना राबऊन सर्वसामान्यांचे जीवन उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या नागपूर येथील दीक्षाभूमी बघण्यासाठी मोफत बसची व्यवस्था सरकारने जाहीर केले असल्याने सर्वत्र कौतुक केले जात आहे.   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष