दैनिक अप्रतिमचे संपादक रविराज ऐवळे 'राज्यस्तरीय निर्भिड पत्रकारीता' पुरस्काराने सन्मानित

 


महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था पुणे न्यूज एक्सप्रेसकडून देण्यात आला पुरस्कार : कोल्हापुरातील मराठी पत्रकार भवनच्या सभागृहात कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

            दैनिक अप्रतिम या वर्तमानपत्राच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देताना कोणतीही भिड भाड न राखता रोखठोक भुमिका मांडणारे दैनिक अप्रतिमचे संपादक रविराज ऐवळे यांना काल राज्यस्तरीय निर्भिड पत्रकारीता गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हापुरातील दसरा चौकातील मराठी पत्रकार भवनच्या सभागृहात हा सत्कार पुणे न्यूज एक्सप्रेसकडून देण्यात आला. पुणे न्यूज एक्सप्रेसचे संपादक मेहबूब सर्जेखान, पँथर आर्मी स्वराज्या क्रांती सेनेचे फिरोज मुल्ला, जेष्ठ संपादक बाबा बोराडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

          दैनिक अप्रतिमचे संपादक रविराज ऐवळे यांना गेल्या महिन्यांभरापासून अनेक पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले आहे. पत्रकारीता करताना समाज्याला अभिप्रेत असणारी खरी पत्रकारीता कशी असावी हे दैनिक अप्रतिमच्या संपादकांकडून माहीती करून घ्यावे असे गौरवोद्गार यावेळी जेष्ठ संपादक बाबा बोराडे यांनी काढत योग्य व्यक्तीला योग्य नावाचा पुरस्कार दिल्याबद्दल त्यांनी पुणे न्यूज एक्सप्रेस परिवाराचे अभिनंदन ही केले. ते म्हणाले, शिरोळ तालुक्यात पत्रकारीतेच्या माध्यमातून रविराज ऐवळे यांनी अत्यंत परखड भुमिका घेतली आहे, असे म्हणत संपादक रविराज ऐवळे यांच्या कामाचे कौतूकही केले. 

         यावेळी रविराज ऐवळे यांच्यासोबत पुरस्कार स्वीकारण्यासाठी शिरोळचे सामजिक कार्यकर्ते पप्पू मोरे, पँथर आर्मी संघटनेचे संतोष आठवले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष