जयसिंगपूरमध्ये धुमस्टाईलने गंठण लंपास
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
जयसिंगपूर येथील अंगणवाडी मदतनीस श्रीमती दिपाली सुनिल कोरे यांच्या गळ्यातील ७५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्याने धुमस्टाईलने लंपास केले असल्याची फिर्याद जयसिंगपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शाहूनगर येथील श्रीमती दिपाली कोरे या शुक्रवारी दुपारी ३.१५ वा. च्या सुमारास संभाजीपूर ते शाहूनगर रस्त्यावरून चालत जात असताना त्या महावीर चौकातील शाळा नं. ९ येथे आल्या असता एका लाल रंगाच्या शाईन मोटारसायकलवरून हेल्मेट घातलेला अज्ञात इसमाने कोरे यांच्या गळ्यातील ७५ हजार रूपये किंमतीचे फॅन्सी चेन गंठण हिसडा मारून लंपास केले. याबाबतची फिर्याद श्रीमती कोरे यांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात दिली असून स. पो. नि. कदम हे अधिक तपास करीत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा