रवींद्र वैरागे स्टार ऑयकॉन पुरस्काराने सन्मानित

 पुणे येथे आमदार भीमराव तापकीर, तृप्ती देसाई यांच्या हस्ते ग्रामसेवक वैरागे यांचा विशेष सन्मान

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

भास्कर भूषण मीडिया संस्थेच्या वतीने शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी व खिद्रापूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक रवींद्र फक्कड वैरागे ( आलास ) यांना राज्यस्तरीय स्टार ऑयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय सेवेत उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा गौरव झाला.

       पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात

भास्कर भूषण मीडियाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार भीमराव तापकीर, प्रसिद्ध अग्निहोत्र प्रचारक नलिनीदीदी पोतदार व भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या हस्ते रवींद्र वैरागे यांना कोल्हापुरी फेटा ,सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

     या समारंभास हरेश तापकीर ,डॉ राजीव लोहार ,मनीषाताई लोहार , वैशाली वाफळेकर , पोपटराव ताकवणे, श्रीदेवी वैरागे ,रमेश वैरागे ,भारती वैरागे , महेश वैरागे ,शशिकला वैरागे, पार्वती वैरागे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

          ग्रामसेवक रवींद्र वैरागे हे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर , शिरोळ तालुक्याच्या प्रशासकीय सेवेत २० वर्षे कार्यरत आहेत. जनतेच्या मूलभूत प्रश्नाबरोबरच स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य, तंटामुक्त गाव, वृक्ष संवर्धन, महिला सबलीकरण, रस्ते यासह गाव विकासावर त्यांनी भर दिला असून कोल्हापूर जिल्हा परिषद तसेच विविध संस्थांच्या वतीने राज्य व राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ठ प्रशासकीय सेवेबद्दल त्यांचा यापूर्वी गौरव झाला आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष