कुरुंदवाड : रोड-रोमियो, विना लायसेन्स गाडी चालवणाऱ्यांच्याकडून १ लाख २५ हजाराचा दंड वसूल
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड पोलीस ठाण्यातर्फे महाविद्यालयाच्या आवारात विनापरवाना वाहन घेऊन फिरणारे रोड-रोमियो तसेच मद्यपान करून वाहन चालवणारे,फॅन्सी नंबर प्लेट लावून वाहन फिरवणाऱ्या अशा 163 हुन अधिक जणांच्यावर कारवाई करत 93 जणांच्यावर खटले भरण्यात आले तर 70 जणांच्यावर दंडात्मक कारवाई करत 1 लाख,25 हजार रुपये दंड वसूल करत कारवाईचा दणका दिला आहे.
पोलीस प्रशासनाने बदलापूर घटनेनंतर ॲक्शन मोड घेत विद्यालय महाविद्यालय परिसरात बंदोबस्त वाढवत कारवाई सुरू केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान सपोनि रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सागर खाडे, ज्ञानदेव सानप,विवेक कराडेसह आदींच्या पथकाने ही कारवाई केली. कुरुंदवाड पोलीस प्रशासनातर्फे गेल्या 15 दिवसापासून सुरू करण्यात आलेल्या या कारवाईत रात्री 11 वाजण्याच्या पुढे मद्यपान करून फिरणाऱ्या 5 जणांवर खटले भरण्यात आले.
सिटबेल्ट नसणे,ट्रिपल सीट दुचाकी,मोबाइलचा वापर,फॅन्सी नंबर प्लेट,बिगर नंबर प्लेट या वाहनांच्यावर कारवाई करत 26 जणांच्यावर खटले तर महाविद्यालयाच्या परिसरात सपोनी फडणीस उपनिरीक्षक सागर पवार हे स्वतः पेट्रोलिंग करत असून 62 रोडरोमियांच्यावर कारवाईचा बडगा उगारत दणका दिला.काहींची वाहने जप्त करून वाहन मालकांच्या विरुद्ध अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास दिल्याचे खटले भरले तर 70 जणांच्यावर दंडात्मक कारवाई करत 1 लाख,25 हजाराचा दंड वसूल केला आहे.वाहतूक शाखेच्या या कारवाईने वाहनधारकातून धडकी भरली आहे. या कारवाईतून रोड रोमीयोना ही चांगलाच दणका बसला आहे.
मद्यपिंच्या चुकीला माफी नाही : स.पो.नि रविराज फडणीस
मद्यपान करून वाहन चालवणे हा एक गुन्हा आहे. यामुळे अपघात घडू शकतात आपल्या कुटुंबाबरोबरच अपघातामुळे एखाद्याची जीवित हानी झाली तर त्याच्या कुटुंबाचेही मोठे नुकसान आहे. त्यामुळे मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांच्यावर खटले भरण्यात येणार असल्याचा इशारा स.पो.नी रविराज फडणीस यांनी दिला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा