मलिकवाड जनशक्तीला 14.19 लाखांवर नफा : अध्यक्ष सुनील भेंडीकटगे यांची माहिती
अमर माने / शिवार न्यूज नेटवर्क :
मलिकवाड, येथील जनशक्ती को-ऑप.क्रेडिट सोसायटीने सभासद, ठेवीदार, ग्राहक व कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळे संस्था प्रगतीपथावर पोहचली असून यंदा संस्थेला 14 लाख 19 हजार 429 रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुनील भेंडीकटगे यांनी दिली. ते संस्थेच्या आठव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. प्रारंभी संचालक व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून सभेला सुरुवात झाली. संचालक नितीन पाटील यांनी स्वागत केले.
संस्थेचे कार्यनिर्वाहक संजय कुन्नूरे ताळेबंद पत्रक व अहवाल वाचनात म्हणाले, सभासद 610, भागभांडवल 14 लाख 56 हजार, निधी 72 लाख 18 हजार, ठेवी 9 कोटी 46 लाख 19 हजार, गुंतवणूक 4 कोटी 49 लाख 7 हजार, कर्जवितरण 5 कोटी 69 लाख 57 हजार असून यंदा 14 लाख 19 हजाराचा निव्वळ नफा झाला आहे. सभासदांना 11 टक्के लाभांश दिला जाणार असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील, माजी सदस्य राजेंद्र पाटील, महावीर दुग्गे यांनी मगोगते व्यक्त केले.
यावेळी उपाध्यक्ष राजू अंकले, संचालक सुभाष वडगावे, तानाजी सोकांडे, नरसिंग कोळी, दत्ता खोत, सदाशिव वंजीरे, संदीप मोर्डे, चंद्रकांत कट्टीकर, संगीता खोत, वंदना वडगावे, विद्या कुन्नूरे, राकेश खोत, सचिन धनवडे, रामचंद्र बाकळे, अविष्कार पाटील, गंगाराम केरुरे, रावसाहेब सौंदलगे, विजय खोत यांच्यासह, ननदी, यादनवाडी सदलगासह, परिसरातील नागरिक उपस्थित होते. ज्ञानेश्वरी पाटील यांनी सूत्रसंचालन केले.तर संजय सुतार यांनी आभार मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा