होम पिचवर श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी झेप
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय,कुरुंदवाड या महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर शनिवार दिनांक २८ मे रोजी १९ वर्षाखालील मुले व मुली तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा पार पडल्या .या स्पर्धेमध्ये श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाडच्या १९ वर्षाखालील मुले व १९ वर्षाखालील मुली खो-खोच्या संघाने प्रथम क्रमांक पटकला.व जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी झेप घेतली. विजयी संघाचे श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य.श्री .आर .जे पाटील यांनी अभिनंदन केले.
या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयाच्या संघाने सहभाग नोंदविला होता . श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयया १९ वर्षाखालील मुलांच्या खो-खो संघाचा अंतिम सामना जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरच्या संघाशी झाला. या सामन्यात श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या १डाव २ गुणांनी जयसिंगपूर कॉलेजच्या संघावर विजय मिळविला. तर १९ वर्षाखालील मुलीच्या संघाचा अंतिम सामना कन्या घोडावत महाविद्यालयाच्या संघाबरोबर झाला .यामध्ये श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने १डाव १ गुणांनी विजय मिळविला. दोन्ही संघाचा खेळ रोमहर्षक होता .या सामन्या दरम्यान महाविद्यालयातील व परिसरातील खो-खो चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती .
तालुकास्तरीय खो - खो स्पर्धा होम स्पीचवर झाल्याने श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाला फायदा झाल्याचे दिसून आले .या स्पर्धा पार पाडण्यासाठी श्री.शरद तावदारे , श्री.धनाजी गावडे ,श्री नलवडे सर, श्री .कुबेर पाटील , श्री.शीतल पाटील श्री.नागेश पुजारी व श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री.एस एस गडदे यांनी परिश्रम घेतले.
तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचा शुभारंभ श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मा .श्री.आर जे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी श्री.शरद तावदारे, श्री.धनाजी गावडे , श्री.नलवडे सर , श्री.कुबेर पाटील, श्री.शितल पाटील ,श्री.नागेश पुजारी ,श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालयाचे सहाय्यक शिक्षक श्री .कुंभार ,क्रीडा शिक्षक श्री.एस एस गडदे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी- विद्यार्थिनी,खेळाडू व खो-खो प्रेमी उपस्थित होते.
या खेळाडूंना संस्थेचे कार्याध्यक्ष मा.श्री.गणपतराव पाटील ,संचालक मा.श्री.गौतम पाटील, उपसंचालक बी.आर थोरात ,उपसंचालक श्री .डी एस माने, शाखेचे कार्याध्यक्ष श्री .अण्णासाहेब माने- गावडे ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.रावसाहेब पाटील, सदस्य श्री.दामोदर सुतार, सदस्या श्रीमती.विनया घोरपडे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. आर जे पाटील ,क्रीडाशिक्षक एस एस गडदे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा