शहा, राधाकृष्णन यांच्या दौऱ्यात स्वाभिमानी दाखविणार काळे झेंडे

 


कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

     स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सन २०२२ -२३ या गळीत हंगामातील तुटलेल्या ऊसास प्रतिटन ४०० रूपयाचा दुसरा हप्ता मिळावा याकरिता पुणे बेंगलोर महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आले होते. सदर आंदोलना दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदेजी व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफजी यांच्या मध्यस्थीने प्रतिटन १०० रूपयाचा तोडगा काढून आंदोलन स्थगित करण्यात आले. जवळपास १० महिने झाले तरीही सरकारकडून सदर प्रस्तावांना मान्यता न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने २५ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व महाराष्ट्राचे राज्यपाल सी राधाकृष्णन यांच्या दौ-यात निदर्शने करून काळे झेंडे दाखविण्यात येणार आहेत. 

    सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सदरचा दुसरा हप्ता मान्यतेसाठी साखर आयुक्त यांचेमार्फत गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये मुख्य सचिव यांचेकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. आज अखेर जवळपास १० महिने झाले याबाबत मुख्य सचिव यांचेकडून याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही. याबाबत जवळपास ६ वेळा मुख्य सचिव व ४ वेळा मुख्यमंत्री यांना याबाबत समक्ष भेटूनही कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. 

   महापूर व महागाईमुळे शेतकरी मेटाकुठीस आला आहे. यामुळे मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांच्या अकार्यक्षमतेचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्यपाल सी राधाकृष्णन यांच्यासमोर निदर्शने करून काळे झेंडे दाखविण्यात येणार असल्याचे निवेदन स्वाभीमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष