सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी कोळी यांनी जपली सामाजिक बांधीलकी

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

     सेवानिवृत्तीनंतरही काही व्यक्ती सामाजिक बांधीलकी विसरत नाहीत. सेवाकाळात समाजाने दिलेले सहकार्य व ऋण विसरले जात नाहीत. समाजासाठी काहीतरी देणे लागतोय या विचाराने भारलेल्या शिरोळ चे सुपुत्र व कुमार विद्या मंदिर घालवाड चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी चन्नाप्पा कोळी यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांची निकड लक्षात घेवून स्पोर्टस कीटसाठी २५,००० रुपयांची देणगी दिली.याबद्दल त्यांचा विशेष सत्कार शिरोळ च्या कर्तबगार गट शिक्षण अधिकारी भारती कोळी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.प्रकाश रत्नाकर सरांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

          मान्यवरांचे हस्ते स्पोर्टस कीटसचे अनावरण करण्यात आले. तसेच पालकांचे उद्बोधन किरण पाटील यांनी केले.बावडेकर उद्योग समूहाचे शरद बावडेकर व आदिनाथ हुक्कीरे यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे, केंद्रप्रमुख आण्णा मुंडे, माजी सरपंच देवा तात्या इंगळे,समाजसेवक रफिक शेख,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद खाडे व सदस्य,शिक्षक गफार बैरागदार,बंडू राऊत,बालाजी माकणे यांच्यासह विद्यार्थी,ग्रामस्थ उपस्थित होते.

           मुख्याध्यापक शरद सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.सूत्रसंचलन सुनिल शिरसाट यांनी तर आभार लक्ष्मीकांत हंकारे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष