बोरगाव येथील जनता सोसायटीला ३६ लाख ३ हजार ६६२ रुपये इतका निव्वळ नफा
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगांव सह परिसरातील एक अग्रगण्य असलेली डॉ शंकर माळी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या श्री जनता को-ऑप - क्रेडिट सोसायटीला चालू आर्थिक वर्षात 36 लाख,03 हजार,662 रुपये इतका निव्वळ नफा झाला असून तळागाळातील लोकांपर्यंत आर्थिक सेवा करत आजवर जनमानसांच्या मनामनामध्ये या संस्थेने आदर निर्माण केला आहे.त्यामुळेच ही संस्था तालुक्यातील सहकार क्षेत्रातील एक आदर्श संस्था आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ शंकर माळी यांनी व्यक्त केले.ते आयोजित संस्थेच्या 25 व्या रौप्य महोत्सवी वर्षातील वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी पदावरून बोलत होते.
प्रारंभी पंचम लिंग महा स्वामिजिंच्या चरण कमलांचे विधिवत पूजन करण्यात आले .यावेळी स्वामीजींनी बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्या व आशीर्वाद वचन केले. श्री लक्ष्मी देवतेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन ,दीप प्रज्वलन सोहळा उपस्थित मान्यवरांचे हस्ते संपन्न झाला. संस्थेचे अहवाल सालात एकूण 1695 सभासद असून भाग भांडवल 27 लाख,34 हजार 500 रुपये आहे.संस्थेचा 10 लाख,33 हजार,595 रूपये निधी आहे. शिवाय संस्थेने 1 कोटी, 03 लाख, 35 हजार, 950 रुपये इतक्या अवाढव्य ठेवीवर, 06 कोटी,06 लाख,63 हजार,786 रुपये इतकी मुबलक कर्जे देऊन , 03 कोटी,81 लाख,85 हजार,25 रुपये इतकी शिल्लक रक्कम ठेवली आहे ,तर अहवाल सालात 36 लाख,03 हजार,662 रुपये इतका निव्वळ नफा मिळविला असल्याचे संस्थापक चेअरमन डॉ शंकर माळी यांनी अहवाल वाचनात सांगितले.
*दरम्यान प्रधान व्यवस्थापक श्री धनंजय काकडे यांनी संस्थेच्या ताळेबंद-अंदाज पत्राचे वाचन करून सभासदांकडून टाळ्यांच्या गजरात मंजुरी मिळवली.*यावेळी युवा नेते उत्तम पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब हवले,अभय मगदूम, बी टी वठारे अर्जुन कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक संचालक आर . एस.पच्यांडी यांनी केले. संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासत सभासद व कर्जदार व शेती,वाहन कर्ज योजनाना अधिक महत्त्व दिले आहे, यावेळी परिसरातील गुणवंत व मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विविध संघ,संस्था यांच्या वतीने डॉ शंकर माळी व संचालक,कर्मचारी यांचां सत्कार करण्यात आला.
यावेळी निपाणी भागचे युवा नेते व सहकार रत्न उत्तम पाटील, सिद्धेश्वर क्रेडिट सोसायटीचे चेअरमन व माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब हावले , निपाणी हाल शुगर साखर कारखाना संचालक रामगोंडा पाटील, बाबासाहेब पाटील, अभय मगदूम, राजू मगदूम, बीटी वटारे, मनोज पाटील, महावीर पाटील, सुरेखा घाळे, अशोक माळी, आर .बी पाटील, जनता को आप क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ शंकर माळी, उपाधक्ष्य मुरारी आईदमाले ,देवगोंडा पाटील, भीमगोंडा पाटील, रावसाहेब पचांडी ,अण्णासाहेब पाटील, बाहुबली अमांनावर, कुमार पाटील, प्रदीप माळी, संदीप माळी ,कल्लाप्पा पुजारी, शकील अपराज, बाबासाहेब को, संगीता माळी, ललिता माळी, संघाचे मुख्य व्यवस्थापक धनंजय गजानन काकडे, सुरेश बाळू सोमाने, प्रतीक्षा प्रशांत सोमाने, विकास महादेव माळी, यांच्यासह सभासद ठेवीदार, कर्जदार,कर्मचारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा