बोरगाव श्री भाग्यलक्ष्मी क्रेडिट संघ नेहमीच सभासदांच्या पाठीशी : चेअरमन जावेद चोकावे यांचे मत
आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
कर्जदार व सभासद हा सहकारी संस्थेचा आर्थिक कणा आहे, आज संकटामुळे कर्जदार हा बँकेत कर्ज काढताना मागेपुढे पाहत आहे .अशा परिस्थितीत ठेवीवरील व्याजदर देण्यासही संस्थांना अनेक अडीअडचणी येत आहेत. पण अशा परिस्थितीमध्ये सभासद नेहमी संस्थेवर विश्वास ठेवून व्यवहार केले. कर्जदार व ठेवीदार यांच्यामुळेच आज संस्थेची प्रगती होत असल्याने बोरगाव श्री भाग्यलक्ष्मी ही संस्था नेहमीच सभासदांच्या पाठीशी राहून त्यांचे हित जोपत असल्याचे मत संस्थेचे चेअरमन जावेद चोकावे यांनी व्यक्त केले.
येथे बोरगाव श्री भाग्यलक्ष्मी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेची आठवी वार्षिक सर्व साधारन खेळी मिळत संपन्न झाली. प्रारंभी अहवाल सालात मयत झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.सहकार क्षेत्रात काम करीत असताना विश्वासहर्ता व प्रामाणिक याला अधिक महत्त्व असते. हे आपण ओळखून कार्य करीत असल्याने आज संस्था प्रगतीपथावर आहे. निस्वार्थ संचालक मंडळ व प्रामाणिक कर्मचारी वर्गामुळे ही छोटी ची संस्था आज प्रगतीपथावर येत आहे. संस्थेत एकूण 782 सभासद ,15 लाख 13 हजार 500 भागभांडवल, 43 लाख 94 हजार 777 वर निधी, सर्वांच्या विश्वासास पात्र राहिल्याने आज संस्थेत 5 कोटी 44 लाख 46 हजार 041 ठेवी आहेत. व्यापारी ,सभासद ,शेतकरी व इतरांना 03कोटी 44 लाख 69 हजार 422 इतके कर्ज वितरण केले असून ,अहवाल सालात संस्थेचे 12 लाख 2 हजार 805. निव्वळ नफा झाले असल्याची माहिती शेवटी जावेद यांनी सांगितले.
यावेळी परमपूज्य श्री महेश आनंद महास्वामीजी भक्ती योगाश्रम हंचनाळ येथील स्वामीजींनी सर्वांना आशीर्वाद वचन केले, तर निवूर्त व्यवस्थापक कुंभार यांनी सभेला मार्गदर्शन केले , संस्थापक अध्यक्ष व उद्योजक माणिक कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांचा संस्थेतर्फे शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे व्यवस्थापक अशोक चिंचले यांनी नफा-तोटा, ताळेबंद पत्राचे वाचन करून मंजुरी मिळवली.
वार्षिक सभेस व्हाईस चेअरमन श्रीकांत गोलेत्तीनवर,संचालक माणिक कुंभार,राजेंद्र माळी,कुमार चीप्रे, शोभा चीपरे,सौरभ पाटील ,विजय गोरवाडे, महादेव कुंभार,अभयकुमार लगारे, सलीम आफराज, ,दिलीप गोसावी ,लक्ष्मी कुंभार, शैलजा पुजारी ,शिवाजी कुंभार,अशोक कुंभार, बाबासाहेब पाटील, डॉ शंकर माळी, यांच्यासह सर्व सभासद शेतकरी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
स्वागत संघाचे व्यवस्थापक अशोक.चींचले यांनी केले तर सूत्रसंचालन आर .एस. पचंडी यांनी केले.शेवटी बाळासाहेब धर्माधिकारी यांनी आभार मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा