यश अकॅडमीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा रविवारी सत्कार
अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड येथील यश अकॅडमीतर्फे विविध स्पर्धा परिक्षेतुन यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तालुक्याचे लोकप्रिय आमदार, माजी राज्यमंत्री डाॅ.राजेद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहीती यश अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सागर माळी यांनी दिली.
सत्कार सोहळा रविवार दि.२२ रोजी सकाळी दहा वाजता.एस.के.पाटील काॅलेज रोडवरील स्पेक्ट्रा अकॅडमी येथे होणार आहे.या कार्यक्रमासाठी कुरुंदवाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस,माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत.
यश अकॅडमीचे विद्यार्थी सागर गावडे,महेश बुबनाळे यांची मुंबई पोलीसपदी,विठ्ठल शिंदे यांची एमपीएससीतुन मंत्रालय क्लाॅर्कपदी,कु.प्रतिक्षा मोरे यांची सिंधूदुर्ग पोलीसपदी,कु.सानिका पाटील हिची रत्नागिरी पोलीसपदी,कु.मोनाली कांबळे,सौ.दिपाली शिंदे,सौ.सुषमा कांबळे यांची आरोग्यसेविकापदी निवड झाली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची स्पर्धा परिक्षेतुन शासकीय सेवेत निवड झाली आहे.यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहीती प्रा.सागर माळी यांनी दिली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा