गर्ल्स हायस्कूल सैनिक टाकळीच्या मुलींचे विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत उपविजेतेपद
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
भोसे ता.मिरज येथे 14 वर्षांखालील मुलींच्या शालेय विभागीय व्हॉलिबॉल स्पर्धेत, "गर्ल्स हायस्कूल सैनिक टाकळी" च्या संघाचं "उपविजेतेपद"अटीतटीच्या लढतीत ग्रामीण भागातील मुलींना मिळालेले यश टाकळी ता शिरोळ पंचक्रोशीतील सर्वांना अभिमान वाटावा असा आहे.
क्वार्टर फायनलमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा होता. सलग दोन सेट जिंकून 25--8, व 25--11असा जिंकून सेमी फायनलमध्ये सातारा जिल्ह्यातील मुलींच्या संघाला,25--18, व 25--11असे हरवून अंतिम सामन्यात सांगली इस्लामपूर या संघाबरोबर चिवट झुंज दिली व उपविजेतेपद पटकावले. संबंधित स्पर्धेत सहभागी मुलींच्या मधून राज्य संघ निवडण्यात येते त्या साठी गर्ल्स हायस्कूल सैनिक टाकळी मधील दोन नावे संभावित निवडीसाठी पूर्वा मोकाशी व वैदई अनिल पाटील ही नावे घेतली आहेत त्या बद्दल सर्वत्र मुलींचं कौतुक होत आहे. क्रीडा प्रमुख वासमकर व सहाय्यक प्रतिक काटकर,साहिल यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा