यश अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत भरारी :आमदार डाॅ.राजेंद्र पाटील यड्रावकर
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्पर्धा परिक्षेची तयारी करवुन घेऊन त्यांना शासकीय सेवेत निवड होईपर्यंत मार्गदर्शन करण्याचे कार्य प्रा.सागर माळी यांनी यश अकॅडमीच्या माध्यमातुन केले आहे.यामुळे अल्पावधीतच यश अकॅडमीचे १०३ विद्यार्थी विविध शासकीय क्षेत्रात चमकले.प्रा.सागर माळी यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असे गौरवोदगार तालुक्याचे लोकप्रिय आमदार,माजी राज्यमंत्री डाॅ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काढले.
कुरुंदवाड येथील यश अकॅडमीच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे उपस्थित होते.
डाॅ.यड्रावकर पुढे म्हणाले,प्रा.सागर माळी यांनी अत्यंत अल्प फीमध्ये विद्यार्थ्याना मार्गदर्शन केल्याने त्यांच्या १०३ विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत नोकरी मिळाली.आज हे विद्यार्थी कमी वयातच स्वतःच्या पायावर उभे राहुन कुटुंबाचे आधार बनले आहेत.यामुळे प्रा.सागर माळी हे यश अकॅडमीच्या माध्यमातुन एकप्रकारे सामाजिक कार्यच करीत आहेत. माजी नगरसेवक रणजीत डांगे यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी यश अकॅडमीचे विद्यार्थी सागर गावडे,महेश बुबनाळे यांची मुंबई पोलीसपदी,विठ्ठल शिंदे यांची मंत्रालय क्लाॅर्कपदी,कु.प्रतिक्षा मोरे हिची सिंधुदुर्ग पोलीसपदी,कु.सानिका पाटील हिची रत्नागिरी पोलीसपदी,कु.मोनाली कांबळे,सौ.दिपाली शिंदे,सौ.सुषमा कांबळे यांची आरोग्यसेविकापदी निवड झाल्याबद्दल आ.यड्रावकर व रामचंद्र डांगे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कु.सानिका पाटील,विठ्ठल शिंदे,सागर गावडे,सौ.दिपाली शिंदे,सौ.सुषमा कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजन करुन दिपप्रज्वलाने करण्यात आली.प्रास्ताविक प्रा.सागर माळी यांनी केले.सुत्रसंचालन कु.तंजिला मुजावर हिने केले.कार्यक्रमास माजी नगरसेवक उदय डांगे,अक्षय आलासे,जवाहर पाटील,रमेश भुजगुडे,राजु गुरव,उदय सांळुखे यांच्यासह विद्यार्थी,पालक,मान्यवर मोठ्या संख्खेने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा