शेडशाळच्या उपसरपंचपदी फैय्याजअहमद सोलापूरे यांची बिनविरोध निवड
अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील शेडशाळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी फैय्याजअहमद सोलापूरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
शेडशाळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ.भारती शिवाजी लाड यांनी सुकाणू समितीने ठरवून दिलेला कालावधी संपल्यामुळे उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता.रिक्त उपसरपंच निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.निवडीच्या अध्यक्षस्थानी सरपंच पुष्पा शिरढोणे होत्या.उपसरपंचपदासाठी फैय्याज अहमद सोलापूरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली.
याप्रसंगी माजी सरपंच गजानन चौगुले, माजी सरपंच किरण संकपाळ, माजी उपसरपंच प्रियांका कल्याणी, माजी उपसरपंच भारती लाड, ग्रामपंचायत सदस्य सुनील संकपाळ, सदाशिव कदम,हैदरअली पाथरवट, ग्रामपंचायत सदस्या मिनाक्षी गडगे,सुनिता नाईक,रोहिणी कोल्हापूरे,करिश्मा पाथरवट, ग्रामविकास अधिकारी सुनील वाघमोडे व ग्रा.पं.कर्मचारी उपस्थित होते.निवडीनंतर नूतन उपसरपंच फैय्याज अहमद सोलापूरे यांचा विविध नेत्यांनी आणि समर्थकांनी सत्कार केला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा